महफिल इनला १.१५ कोटींची नोटीस
By Admin | Updated: April 27, 2016 00:00 IST2016-04-27T00:00:24+5:302016-04-27T00:00:24+5:30
स्थानिक महफिल इन या हॉटेलला अतिरिक्त बांधकामापोटी १ कोटी १५ लाख ८६ हजार ५२० रुपयांची नोटीस मंगळवारी पाठविण्यात आली.

महफिल इनला १.१५ कोटींची नोटीस
अमरावती : स्थानिक महफिल इन या हॉटेलला अतिरिक्त बांधकामापोटी १ कोटी १५ लाख ८६ हजार ५२० रुपयांची नोटीस मंगळवारी पाठविण्यात आली. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशान्वये सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी ही नोटीस पाठविली.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या नेत्तृत्वात काही महिन्यापूर्वी महफिल इनची मोजणी करण्यात आली. यात २३ हजार ६६७ चौरस फूट बांधकाम अतिरिक्त आढळले. त्याचा दंडा म्हणून महफिल इनला १ कोटी १३ लाख ३६ हजार ५१२ रुपयांची नोटीस पाठविली. या आदेशाविरुद्ध महफिल इनचे संचालक न्यायालयात गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यावर महानगरपालिकेला महफिल इनच्या संचालकांची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महफिल इनच्या संचालकांनी पुनर्मोजणीची मागणी केली. त्यानुसार महिनाभरापूर्वी महफिल इनची पुनर्मोजणी करण्यात आली. त्यात पूर्वी पेक्षा ५२२ चौरस फूट बांधकाम पुन्हा अतिरिक्त निघाले. गेल्या २२ वर्षांपासून हे अतिरिक्त बांधकाम असल्याने २ लाख ६३ हजार ३३० रुपये प्रतिवर्षाप्रमाणे २२ वर्षांचा कर म्हणून आता नव्याने महफिल इनला १ कोटी १५ लाख ८६ हजार ५२० रुपयांची नोटीस पाठविण्यात आली आहे.