लालखडी येथे रेल्वे पुलासाठी ११५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST2021-03-15T04:12:59+5:302021-03-15T04:12:59+5:30

-------------- बडनेरा मोदी दवाखान्यात लसीकरणास उत्साह (फोटो आहे) अमरावती : बडनेरा येथील महापालिका माेदी दवाखान्यात ज्येष्ठांसाठी कोरोना लसीकरण सुरू ...

115 crore for railway bridge at Lalkhadi | लालखडी येथे रेल्वे पुलासाठी ११५ कोटी

लालखडी येथे रेल्वे पुलासाठी ११५ कोटी

--------------

बडनेरा मोदी दवाखान्यात लसीकरणास उत्साह (फोटो आहे)

अमरावती : बडनेरा येथील महापालिका माेदी दवाखान्यात ज्येष्ठांसाठी कोरोना लसीकरण सुरू झाले असून, त्याला ज्येष्ठांचा प्रतिसाद लाभत आहे. आमदार रवि राणा, आयुक्त प्रशांत रोडे यांनी गत आठवड्यात दवाखान्यात भेट देऊन लसीकरणाची माहिती जाणून घेतली.

---------------------

मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरात पाणीटंचाई (फोटो घेणे)

अमरावती : मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरात तीन महिन्यांपासून नळाला व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही. यासंदर्भात जीवन प्राधिकरण अभियंत्यांकडे अमोल इंगळे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी निवेदन सादर केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

--------------------

तंत्रनिकेतनसमोर कचऱ्याची समस्या

अमरावती : येथील शासकीय तंत्रनिकेतनसमोरील संरक्षण भिंतीलगत कचरा समस्या नित्याचीच बाब झाली आहे. महापालिका सफाई कर्मचारी कंटेनरमध्ये कचरा आणून टाकतात. त्यानंतर येथून कचरा वाहनांद्धारे कम्पोस्ट डेपोत नेला जातो. कचरा साठवणुकीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

-----------------

बडनेरा येेथे कोंडवाड्यात अतिक्रमण

अमरावती : बडनेरा नवीवस्तीच्या झंझाडपुरा भागात महापालिका पशुंच्या कोंडवाड्यात अतिक्रमण करण्यात आले आहे. परिसरातील रहिवाशांचे या जागेवर डोळा असून, तेथे नागरिक वाहने उभी करतात. पशुंच्या कोंडवाडावर होणारे अतिक्रमण रोखण्यात यावे, अशी मागणी आहे.

Web Title: 115 crore for railway bridge at Lalkhadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.