शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
3
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
4
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
5
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
6
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
7
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
8
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
11
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
13
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
14
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
15
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
16
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
17
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
18
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
19
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
20
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

अमरावती जिल्ह्यात संत्रा बागायतदारांचे ११०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 10:22 IST

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ अशी ओळख असलेल्या वरूड-मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना यंदा ११०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देआंबियाची २५ टक्के फळे शिल्लक, मृग बहर अत्यल्पसंत्रा प्रक्रिया उद्योग हवा मोठ्या प्रमाणात संत्रा लागवडक्षेत्र असले तरीदेखील वरूड व मोर्शी तालुक्यात प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे हे फळ तग धरत नाही. याचा परिणाम थेट भावावर होतो. प्रक्रिया उद्योगाची उभारणी झाल्यास येथील संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येतील

वातावरणाचा बदल कारणीभूत :वीरेंद्रकुमार जोगी।आॅनलाईन लोकमतअमरावती : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ अशी ओळख असलेल्या वरूड-मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना यंदा ११०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. राजस्थान व पंजाबच्या किन्नूचे उत्पादन कमी असल्याने भाव वधारले असले तरी त्याचा फायदा येथील उत्पादकांना मिळू शकत नसल्याचे चित्र आहे.१९८२ साली आलेल्या कोळशी रोगामुळे हजारो हेक्टरमधील संत्राबागा नष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारच्या योजना व संत्रा उत्पादकांच्या जिद्दीमुळे मागील काही वर्षांत संत्राबागा जगू लागल्या आहेत. आजघडीला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टर क्षेत्रात संत्राबागा आहेत. त्यापैकी ५५ हजार हेक्टरमधील संत्राबागा उत्पादनक्षम आहेत. यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात मृग बहर घेतला जातो, तर २० हजार हेक्टर क्षेत्रात आंबिया बहरातून उत्पादन घेतले जाते. साधारणत: १ हेक्टरमध्ये सरासरी १० टन संत्रा उत्पादन होते. मागील काही वर्षांत सरासरी २० हजार रुपये टन असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. यानुसार जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टरमध्ये ११०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. मात्र यंदा मृग बहर अत्यल्प आला, तर आंबिया बहराची फळे मोठ्या प्रमाणात गळल्याने नुकसान झाले आहे.एकेकाळी देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी संत्री खरेदीसाठी वरूडमध्ये येत होते. राजस्थान व पंजाबातही संत्राबागा यशस्वी ठरल्याने व्यापाऱ्यांचा कल तिकडे वाढता झाला. मात्र यंदा पंजाबचा किन्नू व राजस्थानमध्येही संत्री उत्पादन नसल्याने बाजारपेठेत भाव वधारले आहेत. त्याचा फायदा मात्र शेतकºयांना मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी