शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षांत समारंभात ११० सुवर्ण, २२ रौप्यपदके, पारितोषिकांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३७ व्या दीक्षांत समारंभ शनिवारी आभासी पद्धतीने थाटात पार पडला. ३१६ संशोधकांना आचार्य ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३७ व्या दीक्षांत समारंभ शनिवारी आभासी पद्धतीने थाटात पार पडला. ३१६ संशोधकांना आचार्य (पीएच.डी.) पदवी तसेच विद्याशाखानिहाय गुणवत्ता यादीनुसार ११० सुवर्ण, २२ रौप्यपदके, रोख २२ पारितोषिके तसेच ५५ हजार ३५९ पदवी व २४० पदविका या समारंभात विद्यार्थ्यांना जाहीर करण्यात आल्या. विशेषत: या समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावतीने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांना डी.लिट. ही मानद उपाधी प्रदान करण्यात आली.

दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे मुख्य अतिथी आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे होते. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश माेहरील, वैशाली गुडधे, व्ही.डब्ल्यू. निचित, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य मीनल ठाकरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी केले. हा समारंभ कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून घेण्यात आला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, कुलगुरू चांदेकर यांनी विद्यार्थ्यांना पदके, पारितोषिके जाहीर केले. या दीक्षांत समारंभात मुलांमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा तेजस राठी याने पटकावली. पाच सुवर्ण व एक रौप्यपदक त्याच्या खात्यात गेली. मुलींमध्ये अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची सारिका वणवे हिने सहा सुवर्ण, एक रोख पारितोषिक पटकाविले. ८३ विद्यार्थ्यांना पदकांनी गौरविण्यात येणार असून, यात ६५ मुली व १८ मुलांचा समावेश आहे. पदके पटकाविण्यात मुलीच आघाडीवर असल्याचे वास्तव आहे.

दानदाते स्व. डी.एन. उपाख्य बबनराव मेटकर यांच्याकडून कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतीप्रीत्यर्थ संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कारासाठी एक लक्ष रुपये अतिरिक्त दाननिधी प्राप्त झाल्याबद्दलची माहिती कुलसचिव तुषार देशमुख यांनी दिली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली. संचालन मराठी विभागप्रमुख मोना चिमोटे व प्रणव कोलते यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदान व राष्ट्रगीताने झाली. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या चमूने गीताचे सादरीकरण केले.

------------------------

(स्वतंत्र बातमी घेणे)

शंकरबाबांचा मानद मानवविज्ञान पंडित (डी.लिट.) ने सन्मान

समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना मानद मानवविज्ञान पंडित (डी.लिट.) ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी देऊन कुलपतींच्यावतीने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी सन्मानित केले. त्यांना गौरवपत्र, शाल व गाडगेबाबांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. मात्र, समारंभाच्या प्रारंभी विद्यापीठाने चित्रफितीच्या माध्यमातून शंकरबाबांचा जीवनपट उलगडला. शंकरबाबांचे बालपण, शिक्षण आणि अनाथांचा बाप म्हणून १२३ मुला-मुलींचा सांभाळ करताना येणाऱ्या वास्तवाचे दर्शन झाले. डी.लिट. पदवी प्राप्त करण्यासाठी शंकरबाबा हे अनाथ मुलांसह विद्यापीठात उपस्थित झाले होते. अमरावती विद्यापीठाने शंकरबाबांना डी.लिट. पदवीने सन्मानित केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ना. नितीन गडकरी, ना. उदय सामंत यांनी मनोगतातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

----------------