११० कोटींचा दुष्काळ मदतनिधी जिल्ह्यास प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 21:49 IST2019-02-17T21:48:50+5:302019-02-17T21:49:41+5:30
गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या पाच तालुक्यासाठी एकूण २६९.६५ कोटी मागणीच्या तुलनेत शासनाने ११०.४४ कोटींच्या मदतनिधीस शासनाने २५ जानेवारीला प्रशासकीय मान्यता दिली व पहिल्या टप्प्याचे ५५.२२ कोटी उपलब्ध केले. त्याचे वाटप पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा व दुसऱ्या टप्प्यातील ५५.२२ कोटी जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत.

११० कोटींचा दुष्काळ मदतनिधी जिल्ह्यास प्राप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या पाच तालुक्यासाठी एकूण २६९.६५ कोटी मागणीच्या तुलनेत शासनाने ११०.४४ कोटींच्या मदतनिधीस शासनाने २५ जानेवारीला प्रशासकीय मान्यता दिली व पहिल्या टप्प्याचे ५५.२२ कोटी उपलब्ध केले. त्याचे वाटप पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा व दुसऱ्या टप्प्यातील ५५.२२ कोटी जिल्ह्यास प्राप्त झाले आहेत.
शासनाने पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला व नंतर १६ महसूल मंडळामध्ये दुष्काळसदृष्यस्थिती जाहीर केली. मात्र, या मंडळाला दुष्काळ निधीमधून डावलले. यंदा धारणी वगळता जिल्ह्यातील १८०५ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली. यापैकी १०२० गावांना या मदतनिधीपासून डावलले. कृषिपिकांचे ३३ टक्क््यांवर नुकसान झालेल्या क्षेत्रात दोन हेक्टर मर्यादेत दोन टप्प्यात मदतनिधीचे वाटप होत आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे हेक्टरी ६,८०० रुपयांच्या ५० टक्के म्हणजे ३४०० रुपये किंवा एक हजार रुपये, यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती रक्कम पहिल्या टप्प्यात वाटप केली जात आहे. बहुवार्षिक पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्यास हेक्टरी देय १८ हजार रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात नऊ हजार किंवा किमान दोन हजार, यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती प्रदान करण्यात येणार आहे.