११ हजार ग्रामस्थांना जलस्वराज्यचा आधार
By Admin | Updated: March 28, 2017 00:07 IST2017-03-28T00:07:06+5:302017-03-28T00:07:06+5:30
पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून आठ वर्षां पूर्वी दिवंगत माजी सरपंचाने पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती ...

११ हजार ग्रामस्थांना जलस्वराज्यचा आधार
साडेदहा कोटींची योजना : आ़ जगताप यांचे प्रयत्न
मंगरुळ दस्तगीर : पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून आठ वर्षां पूर्वी दिवंगत माजी सरपंचाने पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती आ़वीरेंद्र जगताप यांच्या अथक परिश्रमाने पूर्ण होत असून ११ हजार ग्रामस्थांना जलस्वराज्य पेयजल योजनेचा आधार मिळणार आहे़
मंगरूळ दस्तगीरचे माजी सरपंच सुनील बुटले यांनी या गावाला स्वच्छ पाणी मिळावे म्हणून आ़वीरेंद्र जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला होता़ त्यावेळी आ़जगताप यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री विशेष निधीतून गावाला २० लाखांच्या पाणीपुरवठ्यासाठी निधी दिला होता़ वाढती लोकसंख्या पाहता त्यावेळी सरपंच सुनील बुटले यांनी प्रभावी पाणीपुरवठ्याची योजना अमलात यावी, यासाठी प्रयत्न के ले़ त्यांच्या निधनानंतर आ़वीरेंद्र जगताप यांनी जलस्वराज्य योजनेचा लाभ येथील ग्रामस्थांना मिळावा म्हणून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला़
राज्य शासनाने या गावासाठी १० कोटी ३३ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली आहे़. या योजनेची अंमलबजावणी, नियोजन, देखभाल दुरूस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे़ अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करीत असलेल्या ११ हजार ग्रामस्थांना पेयजल योजनेचा आधार मिळणार असल्याने सुरेश निमकर, संगीता निमकर यांनी त्यांचे आभार मानले. (वार्ताहर)