जिल्ह्यात ११९ नवीन अंगणवाड्यांना मंजुरी
By Admin | Updated: December 7, 2014 22:42 IST2014-12-07T22:42:49+5:302014-12-07T22:42:49+5:30
जिल्ह्यात सन २०१४-२०१५ या वर्षात नवीन ११९ अंगणवाड्यांना मंजुरी दिली आहे. मंजुरी दिलेल्या सर्व अंगणवाड्यांचे बांधकाम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत संबंधिताना आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात ११९ नवीन अंगणवाड्यांना मंजुरी
अमरावती : जिल्ह्यात सन २०१४-२०१५ या वर्षात नवीन ११९ अंगणवाड्यांना मंजुरी दिली आहे. मंजुरी दिलेल्या सर्व अंगणवाड्यांचे बांधकाम सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत संबंधिताना आदेश दिले आहेत. अंगणवाडी केंंद्राच्या बांधकाम निधीत राज्य शासनाने वाढ केली असल्यामुळे रखडलेल्या अंगणवाडी इमारत बांधकामाला वेग येणार आहे.
जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्षांआतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी अंगणवाडी केंद्र शासनाने सुरू केले आहेत. जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. अंगणवाडी केंद्राच्या इमारतींना बांधकामासाठी राज्य शासनामार्फत ४ लाख रूपये निधी देण्यात येत होता. मात्र हा निधी सध्याची वाढती महागाई लक्षात घेता निधी कमी पडत असल्यामुळे अंगणवाडीची ही कामे करण्यासाठी कंत्राटदार व ग्रामपंचायतीही पुढाकार घेत नव्हत्या. आता मात्र राज्य शासनाने अंगणवाडी बांधकामासाठी प्रति अंगणवाडी ६ लाख रूपये या प्रमाणे निधी उपलब्ध करून दिल्याने रखडलेली अंगणवाडी केंद्र इमारतीची कामे नव्याने सुरू झाली आहेत. जिल्ह्यात या वर्षात नवीन ११९ अंगणवाड्यांना मंजुरी दिली आहे. यासाठी प्रती अंगणवाडी सहा लाख याप्रमाणे ७ कोटी १४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.