‘108’ ने वाचविले 1800 जणांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 05:00 AM2021-02-24T05:00:00+5:302021-02-24T05:01:07+5:30

कोरोनाकाळात संचारबंदीमुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ फारशी नसल्याने दरवर्षीच्या तुलनेत ५० टक्के अपघाताच्या घडल्या. यामध्ये तातडीने उपचार मिळवून देण्यात १०८ रुग्णवाहिकांनी मोलाची कामगिरी बजावल्याची माहिती झोनल असिस्टंट अक्षय देशमुख यांनी दिली. सेवा प्रारंभ केल्यापासून अकोला झोनमधील ६ लाख ४७ हजार ६६९ रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत जिवंत राहण्यास मदत झाली. यामध्ये आरटीए, गर्भवती, कार्डियाक रुग्णांचा समावेश राहिला.  

‘108’ saved 1800 lives | ‘108’ ने वाचविले 1800 जणांचे प्राण

‘108’ ने वाचविले 1800 जणांचे प्राण

Next
ठळक मुद्दे ६.४९ लाख रुग्णांना सेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अकोला झोन अंतर्गत अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाऊनच्या एक वर्षाच्या काळात ४ लाख ५०४ अपघाताच्या घटना घडल्या. यामध्ये १८०० अपघातग्रस्तांना ‘डायल १०८’ रुग्णवाहिकांद्वारे तातडीने रुग्णालयात पोहचविल्यामुळे जीवदान मिळाला.
कोरोनाकाळात संचारबंदीमुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ फारशी नसल्याने दरवर्षीच्या तुलनेत ५० टक्के अपघाताच्या घडल्या. यामध्ये तातडीने उपचार मिळवून देण्यात १०८ रुग्णवाहिकांनी मोलाची कामगिरी बजावल्याची माहिती झोनल असिस्टंट अक्षय देशमुख यांनी दिली. सेवा प्रारंभ केल्यापासून अकोला झोनमधील ६ लाख ४७ हजार ६६९ रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत जिवंत राहण्यास मदत झाली. यामध्ये आरटीए, गर्भवती, कार्डियाक रुग्णांचा समावेश राहिला.  
सन २०१४ ते २०२० या कालावधीत वाशिम जिल्ह्यात ७१ हजार ३०१ रुग्णांना सेवा देण्यात आली. यात रस्ते अपघाताच्या घटनांतील ५ हजार ९६१ रुग्णांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ३७ हजार ८५७ रुग्णांना सेवा देण्यात आली. यामध्ये रस्ते अपघातातील ११ हजार १६८ रुग्णांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ६२५ रुग्णांना सेवा देण्यात आली. यात रस्ते अपघातातील १० हजार २९२ रुग्णांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात २ लाख १ हजार ४६६ रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेची सेवा देण्यात आली. यात रस्ते अपघातातील १३३९५ रुग्णांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात १ लाख २ हजार ४२० रुग्णांना सेवा देण्यात आली. त्यात ५७२५ रुग्ण रस्ते अपघातातील आहेत.
समुदायाला आ‌वाहन
१०८ टोल फ्री क्रमांकावर कॉल करा आणि अपघाताचा अचूक पत्ता द्या. पीडित व्यक्तीजवळ राहा आणि १०८ कॉल सेंटर किंवा डॉक्टरांकडून आलेल्या ऑनलाईन सूचनांचे अनुसरण करा. पीडितेला हलवण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे आणखी नुकसान होईल. शक्य असल्यास रक्तस्त्राव थांबवा, असे आवाहन केले.
अकोला झोन अंतर्गत २१२ रुग्णवाहिका २४ तास रुग्णांच्या सेवेत आहेत. आमचे डॉक्टर, चालक हे केवळ कोविडयोद्धेच नव्हे, तर खरे जीव वाचविणारे देवदूत आहेत.
- डॉ. दीपककुमार उके, 
विदर्भप्रमुख, 
महाराष्ट्र इमर्जंसी मेडिकल सर्व्हिस (एमईएमएस)

Web Title: ‘108’ saved 1800 lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.