सिंचनासाठी १०८ दिवस मिळणार धरणाचे पाणी

By Admin | Updated: November 2, 2014 22:22 IST2014-11-02T22:22:09+5:302014-11-02T22:22:09+5:30

प्रकल्पाचे पाणी देताना प्रथम पिण्यासाठी, द्वितीय सिंचन व तिसऱ्या क्रमांकावर उद्योगाकरिता आरक्षित आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी देताना दोन वर्षांपासून कपात करण्यात येत आहे़

108 days of irrigation water for irrigation | सिंचनासाठी १०८ दिवस मिळणार धरणाचे पाणी

सिंचनासाठी १०८ दिवस मिळणार धरणाचे पाणी

रबी हंगाम : दोन वर्षांपासून सतत पाण्यात कपात
मोहन राऊत - अमरावती
प्रकल्पाचे पाणी देताना प्रथम पिण्यासाठी, द्वितीय सिंचन व तिसऱ्या क्रमांकावर उद्योगाकरिता आरक्षित आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी देताना दोन वर्षांपासून कपात करण्यात येत आहे़ यंदा पाच टप्प्यात १०८ दिवस रबी हंगामाकरिता हे पाणी मिळणार आहे़
चांदूररेल्वे जुन्या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली़ या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाले़ १३ कोटी रूपयांचे मिळालेल्या मूळ प्रशासकीय मान्यतेवरून हा प्रकल्प १३ जुलै २००९ पर्यंत १ हजार ३७४़६४ कोटींवर पोहचला. अमरावती विभागातील सर्वात मोठे हे प्रकल्प असल्यामुळे ७०,१६९ हेक्टरमधील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती़ सर्वाधिक सिंचनाचा लाभ धामणगाव, चांदूररेल्वे तिवसा या तालुक्याला मिळणे अपेक्षित होते़ धामणगाव, चांदूररेल्वे, शेतीसाठी व अमरावतीकरांना पिण्यास पाणी मिळावे, असे स्वप्न जाधव यांच्यासह राजकीय नेत्यांचे होते़ आज पिण्याच्या पाण्याला प्रथम तर शेतीला द्वितीय तसेच उद्योगाला तिसऱ्या स्थानावर पाणी मिळावे, असा कायदा आहे़ मात्र पाण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी आंदोलन करण्याची वेळ आली आहे़

Web Title: 108 days of irrigation water for irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.