जिल्ह्यात आठ महिन्यांत आढळले १०८ कर्करुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:32+5:30

जिल्ह्यात १ एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान विविध उपक्रमांच्या माध्यमातून रुग्ण तपासणी करण्यात आली. ३० वर्षांवरील मनुष्यांची इन्युमिरेशन रजिस्टरमध्ये आशा व सहायक कर्मचाऱ्यांच्या हस्ते नोंदणी तसेच मधुमेही, उच्च रक्तदाब, तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा, गर्भाशय मुख कर्करोगाबाबत प्राथमिक तपासणी करण्यात आली.

108 cancers were found in the district in eight months | जिल्ह्यात आठ महिन्यांत आढळले १०८ कर्करुग्ण

जिल्ह्यात आठ महिन्यांत आढळले १०८ कर्करुग्ण

ठळक मुद्देजिल्हा आरोग्य विभाग : मधुमेहाचे सहा हजारांवर रुग्ण


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा आरोग्य विभागातर्फे एप्रिलपासून तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविलेल्या राष्ट्रीय असंसर्ग रोगनियंत्रण मोहिमेत संशयित कर्करुग्णांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान १०८ बाधित आढळून आले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात १ एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान विविध उपक्रमांच्या माध्यमातून रुग्ण तपासणी करण्यात आली. ३० वर्षांवरील मनुष्यांची इन्युमिरेशन रजिस्टरमध्ये आशा व सहायक कर्मचाऱ्यांच्या हस्ते नोंदणी तसेच मधुमेही, उच्च रक्तदाब, तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा, गर्भाशय मुख कर्करोगाबाबत प्राथमिक तपासणी करण्यात आली. यामध्ये १३७७ महिला व १५४३ पुरुष असे एकूण २ हजार ९२० मधुमेही आढळून आले. ३३४३ महिला व २९४७ पुरुष असे एकूण ६ हजार ३१७ उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळून आलेत. दोन्ही आजार १५३५ रुग्णांमध्ये आढळले. मुख कर्करोग १० महिला व २८ पुरुषांमध्ये आढळला. ६१ महिलांना स्तनाचा, तर नऊ महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर किमोसह विविध उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संशयित रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तालुका आरोग्य केंद्रात संदर्भित करण्यात येते. सोबतच वरील आजाराबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत तपासणीचा सल्ला देण्यात येतो. लक्षणे आढळताच जवळपासच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांनी तपासणी करून घ्यावी.
- श्यामसुंदर निकम
जिल्हा शल्यचिकित्सक

एक लाखांवर संशयितांची तपासणी
आरोग्य विभागामार्फत एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, पक्षाघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य सुश्रुषा कार्यक्रम, राष्ट्रीय उपशामक सेवा कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम, मेळघाट सेल, माहेरघर, मोबाइल मेडिकल युनिटच्या माध्यमातून ग्रामीण जनतेत आजाराची तपासणी करण्याचा संदेश दिला जात आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत एक लाखांवर संशयितांची तपासणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

Web Title: 108 cancers were found in the district in eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.