शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

१०८ रुग्णवाहिका लाखो रुग्णांकरिता ठरली देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 3:44 PM

शासनाने सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा आपत्कालीन स्थितीत देवदूत बनून येत असल्यामुळे लाखो नागरिकांसाठी ती जीवनदायिनी बनली आहे.

ठळक मुद्देराज्यात बीव्हीजीकडून संचालन३३ लाख लोकांना मिळाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कवैभव बाबरेकरअमरावती : शासनाने सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा आपत्कालीन स्थितीत देवदूत बनून येत असल्यामुळे लाखो नागरिकांसाठी ती जीवनदायिनी बनली आहे. पाच वर्षांत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने राज्यातील ३२ लाख ८८ हजार ८७० रुग्णांना रुग्णालयांत पोहचवून अनेकांचे विश्वास संपादन केले आहे.या रुग्णवाहिका सेवेचे संचालन महाराष्ट्रात बीव्हीजी इंडिया लिमिटेड व यूके सास यांच्यामार्फत केले जाते. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी २६ जानेवारी २०१४ रोजी या रुग्णवाहिका सेवेची सुरुवात झाली. २३ मूलभूत जीवनरक्षक प्रणाली आणि सहा अत्याधुनिक जीवनरक्षक प्रणालीने सज्ज असलेल्या या रुग्णवाहिका १२ प्रकारच्या तातडीच्या आजारी रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचवून उपचार मिळण्यास यशस्वी ठरल्या आहेत. त्यामध्ये अपघात (वाहन) प्रकरणी २ लाख ८७ हजार २३०, मारहाणप्रकरणी ४० हजार १३०, जाळून घेतलेल्या १७ हजार ६५०, हृदयविकारचे ११ हजार ४०, बाल जन्मप्रकरणी २१ हजार ३९१, उंचावरून पडलेले ९१ हजार ९५७, उन्माद/ विषबाधा प्रकरणी १ लाख ९ हजार ७१४, गर्भवती/प्रसूतीप्रकरणी ८ लाख ९ हजार ६९९, मोठ्या दुर्घटनेतील १७ हजार ३८४, वैद्यकीय उपचाराकरिता १५ लाख ६२ हजार ७०८, पॉली ट्रॉमाचे ७४१४ आणि इतर ३ लाख १२ हजार ५५३ अशा वर्गवारीतून तब्बल ३२ लाख ८८ हजार ८७० रुग्णांना राज्यातील विविध कानाकोपऱ्यांतून संबंधित जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणून दाखल करण्यात आले आहे.अमरावतीत २९ रुग्णवाहिकाअमरावती जिल्ह्याकरिता १०८ क्रमांकाच्या २९ रुग्णवाहिका विविध आरोग्य केंद्रांना संलग्न आहेत. २०१४ पासून या रुग्णवाहिकांकडून वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या दरवर्षी वाढतीच आहे. २०१४ मध्ये ६९३०, २०१५ मध्ये ११ हजार २५, २०१६ मध्ये २२ हजार ३४३, २०१७ मध्ये २२ हजार ५२६, २०१८ मध्ये आतापर्यंत ४५ हजार ५५५ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला.मेळघाटात मोबाइल रुग्णवाहिकामेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात चारचाकी वाहने पोहोचणे कठीण असलेल्या ठिकाणाहून रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी दुचाकी सज्ज केल्या आहेत. अशा पाच मोबाइल रुग्णवाहिका या भागात देण्यात आल्या आहेत.भारत विकास ग्रुप इंडियाकडून रुग्णांना उपचार मिळण्यासाठी तत्पर सेवा दिली जाते. १०८ रुग्णवाहिकांद्वारे आजपर्यंत लाखो जणांना आपत्कालीन मदत देण्यात आली आहे. पुढेही ही सेवा अविरत सुरू राहील.- सूरज धारपवार, जिल्हा व्यवस्थापक, बीव्हीजी

टॅग्स :Healthआरोग्य