शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मेळघाटात साडेपाच वर्षांत १०६४ बालकांनी दम तोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 13:17 IST

Amravati : कुपोषण रोखण्यासाठी विविध योजना मात्र शासनाला तरीही अपयश

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती :मेळघाटातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु, या योजनेतून मेळघाटातील बालमृत्यू थांबविण्यात शासकीय यंत्रणेला अजूनही मेळघाट बालमृत्यू व मातामृत्यू मुक्त करता आलेला नाही. एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०२४ या साडेपाच वर्षाच्या कालावधीमध्ये मेळघाटमध्ये १ हजार ६४ बालकांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. त्याचबरोबर ३२ माता मृत्यूचीही नोंद करण्यात आली आहे.

शासनाकडून मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यामध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही कुपोषण रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु, तरीही मेळघाटातील बालमृत्यूचे चक्र थांबलेले नाही. आजही मेळघाटातील नागरिकांना आरोग्याच्या अपुऱ्या सोयी-सुविधा असल्याने अनेक गंभीर बालकांना अमरावती येथे जिल्हा स्त्री रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे. मेळघाटातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे प्रत्येक वेळी आश्वासन मिळते. परंतु, प्रत्यक्षात उपाययोजना राबविली जात नसल्याचे सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे. 

धारणी तालुक्यात सर्वाधिक बालमृत्यूची नोंदमेळघाटातील धारणी तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे. तर चुरणी व चिखलदरा येथे ग्रामीण रुग्णालय आहेत. तर, मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणेनुसार, एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०२४ मध्ये नोंद झालेल्या बालमृत्यूमध्ये सर्वाधिक ७१९ मृत्यू हे धारणी तालुक्यात आहेत. तर, चिखलदरा तालुक्यात ३४५ बालकांच्या मृत्यूची नोंद आहे.

बालमृत्यू रोखण्यासाठी अशी आहे आरोग्य यंत्रणामेळघाटमध्ये धारणी व चिखलदरा असे दोन तालुके असून, एकूण ३२४ गाव आहेत. तर, येथील लोकसंख्या ही ३ लाख २४ हजार इतकी आहे. या ठिकाणी एक उपजिल्हा रुग्णालय, दोन ग्रामीण रुग्णालय, ११ प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य पथक ६, अॅलोपॅथी एक तर आयुर्वेदिक ४ दवाखाने, फिरते आरोग्य पथक ७, उपकेंद्र ९२, रुग्णवाहिका १०२ क्रमांकाच्या ३४ तर १०८ क्रमांकाच्या ९ या सोबतच २२ भरारी पथके आहेत. ती २४ बाय ७ सजग असतात.

मेळघाटातील वर्षनिहाय बालमृत्यूची नोंद वर्ष                               धारणी                     चिखलदरा २०१९-२०                         १७८                           ६८२०२०-२१                         १४३                           ७० २०२१-२२                         १२०                            ७५२०२२-२३                         १२५                           ५० २०२३-२४                         १०३                            ५३ २०२४ सप्टें. पर्यंत                ५०                            २९एकूण                            ७१९                         ३४५

टॅग्स :Melghatमेळघाटmelghat-acमेळघाटAmravatiअमरावती