१०६ कोटींच्या नियोजनाचा डीपीसीकडे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:34+5:302021-02-05T05:25:34+5:30
अमरावती : ग्रामीण भागातील विविध विकासकामांचे नियोजन जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत करण्यात आले. यानुसार सुमारे १०६ कोटी ७५ ...

१०६ कोटींच्या नियोजनाचा डीपीसीकडे प्रस्ताव
अमरावती : ग्रामीण भागातील विविध विकासकामांचे नियोजन जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत करण्यात आले. यानुसार सुमारे १०६ कोटी ७५ लाख १७ हजार रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीसी) सादर केला आहे. यामध्ये जिल्हाभरातील तीर्थक्षेत्र विकास, ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्ती, रस्ते डांबरीकण, खडीकरण करणे, जनसुविधा, आयुर्वेदिक दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी बांधकाम, शाळा वर्गखोल्यांची दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करणे, महिला व बालकल्याण विभागाकडून योजना राबविणे, कोल्हापुरी बंधारे व आदिवासी उपयोजनांतर्गत विविध कामे करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे. सुमारे १०६ कोटी रुपयांचे सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचे विकासाचे नियोजन केले असून, याकरिता लागणारा निधी मागणीचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन विभागाकडे सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले. विशेष म्हणजे १०६ कोटींच्या निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला असला तरी यामध्ये अधिक निधी मिळविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांकडून सकारात्मक न्याय मिळेल. या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागात जास्तीत जास्त विकासकामे केली जातील.
बॉक़्स
असा आहे निधी मागणीचा प्रस्ताव
जनसुविधा ४.५१, आयुर्वेदिक दवाखाने ५२.२८, प्राथमिक आरोेग्य केंद्र बांधकाम ३.१६, उपकेंद्र बांधकाम ४.७३, अंगणवाडी बांधकाम ४.९६, महिला बालकल्याण योजना ८२ लाख, कोल्हापुरी बंधारे ४.२०, औषधी पुरविणे आदिवासी क्षेत्र ६० लाख, शाळा दुरुस्ती १३.४३, तीर्थक्षेत्र ७.७५, ग्रामीण रस्ते २६ कोटी, इतर जिल्हा मार्ग १८ कोटी, आदिवासी उपयोजना ४.५०, असे एकूण १०६ कोटी ७५ लाख १८ हजार रुपयांचा निधी मागणीचा प्रस्ताव आहे.