शेतकरी संकट निवारण्यासाठी १०१ आरत्यांची ओवाळणी
By Admin | Updated: October 20, 2015 00:31 IST2015-10-20T00:31:40+5:302015-10-20T00:31:40+5:30
सद्यस्थितीत शेतकरी प्रचंड संकटांचा सामना करीत आहेत. आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे.

शेतकरी संकट निवारण्यासाठी १०१ आरत्यांची ओवाळणी
देवीला शिवसेनेचे साकडे : मातोश्री दुर्गोत्सव मंडळाचा उपक्रम
अमरावती : सद्यस्थितीत शेतकरी प्रचंड संकटांचा सामना करीत आहेत. आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना आत्मबळ मिळावे, असे साकडे स्थानिक मातोश्री दुर्गोत्सव मंडळ व शिवसेनेद्वारे आई दुर्गेला घालण्यात आले. १०१ ताटांची दीपआरती करून शेतकऱ्यांसाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बंड, उपशहर प्रमुख अमोल निस्ताने, नगरसेविका स्वाती निस्ताने, नाना ०ाागमोते, वर्षा भोयर, कांचन ठाकूर, सुवर्णा राऊत, आशिष सहारे, विनय चतुर, सुनील राऊत, मंडळाचे अध्यक्ष चैतन्य वर्मा, कार्याध्यक्ष कैलास गिरोळकर, सचिव मुन्ना भार्गव, कोषाध्यक्ष मोहन क्षीरसागर, उपाध्यक्ष अरूण पडोळे, सहसचिव प्रशांत काळे, सहकोषाध्यक्ष अरविंद मुळे, शैलेंद्र डहाके, गुड्डू मिश्रा, सुभाष केवतकर, मुरलिधर वाईकर, संजय बुंदेले, गुड्डू मिश्रा, आदित्य बोंडे, उमेश गोगटे, प्रशांत कुळमेथे, रामराव काळे, पिंटू चावरे आदी मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)