१०० श्रमिक पत्रकारांना मिळणार घरे

By Admin | Updated: March 23, 2015 00:28 IST2015-03-23T00:28:22+5:302015-03-23T00:28:22+5:30

समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लेखणी झिजविणाऱ्या श्रमिक पत्रकारांसाठी खऱ्या अर्थाने आज 'गुडन्यूज' आहे.

100 workers will get news for journalists | १०० श्रमिक पत्रकारांना मिळणार घरे

१०० श्रमिक पत्रकारांना मिळणार घरे

अमरावती : समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लेखणी झिजविणाऱ्या श्रमिक पत्रकारांसाठी खऱ्या अर्थाने आज 'गुडन्यूज' आहे. १०० श्रमिक पत्रकारांना म्हाडामार्फत घरे बांधून देण्याची हमी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. विश्रामगृहात आयोजित पत्रकारांच्या गृहनिर्माण बैठकीत ते बोलत होते. बडनेरा मार्गावरील ७ हजार ५०० चौ.फु. क्षेत्रावरील जागा श्रमिक पत्रकार गृहनिर्माणसाठी प्रस्तावित आहे. याबाबतीतील जमिनीचा डीपी प्लॅनदेखील मंजूर झाला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील बडनेरा मार्गावरील या जागेचे पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींना घेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केल्या.
सन २००९-२०१० मध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी गृहनिर्माण योजना राबविण्याचे जाहीर केले. सध्या अमरावतीमध्ये जवळपास विविध वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे यामध्ये २०० ते २५० च्या दरम्यान श्रमिक पत्रकार काम करतात, अशी माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दिली. त्यांना घरे देण्यासाठी शासनाने जमीन उपलब्ध करुन द्यावी, यासाठी पत्रकार संघटनांनी निवेदन दिलेले होते. यावेळी म्हाडाचे मुख्याधिकारी एस.एस. साधवाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाडाच्या गृहनिर्माण योजनांमध्येदेखील पत्रकारांसाठी घरांचा राखीव कोठा असतो. मात्र, अमरावती व अकोला महानगरपालिका क्षेत्रात २.५ चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू झाल्यास प्रस्तावित जागेवर २ बीएचके, १ बीएचकेच्या प्लॅटची निर्मिती करता येणे शक्य आहे.
म्हाडाकडे सध्या अकोली, बडनेरा येथील जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे यावेळी उपस्थित पत्रकार संघटना व त्यांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. व चर्चेंतर्गत पुन्हा एकदा जागेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी शहरात उपलब्ध जागेची माहिती त्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते व उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांचेकडून घेतली. गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारांच्या घराचा मुद्दा चर्चेत असल्याने या बैठकीमध्ये त्यावर जलदगतीने कार्यवाही करण्यात येणार असल्याने श्रमिक पत्रकार बंधूंकडून आनंद व्यक्त केल्या जात आहे.

Web Title: 100 workers will get news for journalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.