'अभ्यासा 'स्कूलची १०० नंबरी झेप

By Admin | Updated: May 29, 2016 00:20 IST2016-05-29T00:20:01+5:302016-05-29T00:20:01+5:30

से. बी. एस. ई. १० वी च्या शनिवारी घोषित झालेल्या निकालात येथील अभ्यासा इंग्लिश स्कूलने आकाश भरारी घेतली आहे.

100 marks jump in school 'study' | 'अभ्यासा 'स्कूलची १०० नंबरी झेप

'अभ्यासा 'स्कूलची १०० नंबरी झेप

सीबीएसई : पहिल्याच बॅचमधील विद्यार्थ्यांची आकाशभरारी
अमरावती : से. बी. एस. ई. १० वी च्या शनिवारी घोषित झालेल्या निकालात येथील अभ्यासा इंग्लिश स्कूलने आकाश भरारी घेतली आहे. पहिल्या बॅचचा १०० टक्के निकाल हा अभ्यासा स्कूलच्या इतिहासात सुवर्णक्षण ठरला आहे.
अभ्यासा सी. बी. एस. ई. च्या पहिल्या बॅचचा निकाल १०० टक्के लागला. तसेच १२ विद्यार्थी मेरीटमध्ये आले आहेत. समिक्षा कांडलकर, सायली थोरकर, श्रेयती नरसिंगकर, आदित्य येवले, अजिंक्य मानेकर, हर्ष राऊत, तनिष्क बोधानी, तन्मय देशमुख यांना सी. जी. पी. ए. मध्ये १० पैकी १० गुण मिळाले आहे. तर राधिका हरसुले ९.८ सी. जी. पी. ए., भरत बजाज ९.८ सी. जी. पी. ए., तरूण तख्तानी ९.६, करण मुदकोंडवार ९.४ याशिवाय ओंकार सोमनाथे, यश व्यास प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या कार्यकारी संचालिका कांचनमाला गावंडे, प्राचार्या रेखा सुर्वे व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच जे. डी. पाटील सांगळूदकर स्मृती केंद्राचे अध्यक्ष कुलभूषण गावंडे पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे व अभ्यासाच्या सर्व शिक्षक समुदायाचे अभिनंदन केले आहे. पहिल्याच वर्षी शतप्रतिशत निकाल लागल्याने अभ्यासा स्कूलच्या गुणवत्तेवर मोहर उमटली. (प्रतिनिधी)

Web Title: 100 marks jump in school 'study'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.