ट्रान्सपोर्टनगरातील १०० झोपड्या जमीनदोस्त
By Admin | Updated: January 14, 2015 23:00 IST2015-01-14T23:00:29+5:302015-01-14T23:00:29+5:30
स्थानिक ट्रान्सपोर्टनगरातील निर्माणाधीन ‘मॉल’च्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या या संयुक्त कारवाईमुळे

ट्रान्सपोर्टनगरातील १०० झोपड्या जमीनदोस्त
अमरावती : स्थानिक ट्रान्सपोर्टनगरातील निर्माणाधीन ‘मॉल’च्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई बुधवारी करण्यात आली. महापालिका आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या या संयुक्त कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. तब्बल १०० अतिक्रमित झोपड्या या कारवाईदरम्यान हटविण्यात आला.
महापालिका अतिक्रमण हटाव पथकाचे निरीक्षक उमेश सवई यांनी सांगितले की, ट्रान्सपोर्टनगरातील निर्माणाधीन ‘मॉल’च्या जमिनीवर परिसरातील नागरिक तसेच वाहनचालकांनी अतिक्रमण केले आहे. महापालिकेने या नागरिकांना यापूर्वी स्वत:हून अतिक्रमण हटविण्याबाबतच्या नोटीस बजावल्या होत्या. परंतु नोटीसचे उत्तर न मिळाल्याने बुधवारी महापालिकेने पोलिसांच्या सहकार्याने परिसरातील अतिक्रमण हटविले. सकाळी ७.१५ वाजता ही कारवाई सुरू झाली. यावेळी नागपुरी गेट व गाडगेनगरचे ठाणेदार तसेच पोलीस पथक मिळून एकूण ७० ते ८० कर्मचाऱ्यांचा ताफा उपस्थित होता.
सहायक आयुक्त एल.एन.तडवी यांच्या नेतृत्वात या भागातील तब्बल १०० झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. इतकेच नव्हे, तर अतिक्रमित दुकानेदेखिल हटविण्यात आल्या आहेत. मागील वर्षभरापासून या अतिक्रमणामुळे महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. शेवटी पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र संबंधित अतिक्रमणधारकांची ऐन थंडीच्या दिवसांत हाल होत आहे.