१० नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर

By Admin | Updated: October 6, 2016 00:25 IST2016-10-06T00:25:08+5:302016-10-06T00:25:08+5:30

जिल्ह्यातील १० नगरपरिषदांच्या कार्यकाळ डिसेंबर २०१६ अखेर संपुष्टात येत असल्याने सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाची लगबग वाढली आहे.

10 Reservations for the Chief of the President | १० नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर

१० नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर

 मुंबईत सोडत : थेट जनतेमधून नगराध्यक्षाची निवडणूक
अमरावती : जिल्ह्यातील १० नगरपरिषदांच्या कार्यकाळ डिसेंबर २०१६ अखेर संपुष्टात येत असल्याने सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाची लगबग वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी मंत्रालयातील परिषद सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
यावेळी प्रथमच थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडल्या जाणार असल्याने नगरपरिषदांचे आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. या सोडतीमध्ये धामणगावचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी, चिखलदरा सर्वसाधारण स्त्री राखीव, शेंदूरजना घाट अनु. जाती, अचलपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव, अंजनगाव सुर्जी सर्वसाधारण, वरुड सर्वसाधारण स्त्री राखीव, दर्यापूर सर्वसाधारण, चांदूररेल्वे नागरिकांचा मागासप्रवर्ग, चांदूरबाजार नागरिकांचा मागासप्रवर्ग व मोर्शी नगरपरिषदसाठी सर्वसाधारण स्त्री राखीव असे आरक्षण जाहीर करण्यात आले.
सद्यस्थितीत राज्य निवडणूक आयोगाद्वारा मतदार यादीचा कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये २६ सप्टेंबरला प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येवून ७ आॅक्टोबरपर्यंत या यादीवर हरकती व सूचना स्वीकारण्यात आल्या. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी १५ आॅक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे व नंतर कुठल्याही क्षणी नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.

Web Title: 10 Reservations for the Chief of the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.