मोझरी विकास आराखड्यासाठी १० कोटी
By Admin | Updated: April 26, 2016 23:59 IST2016-04-26T23:59:48+5:302016-04-26T23:59:48+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्रीक्षेत्र मोझरी येथे मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १०.३१ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.

मोझरी विकास आराखड्यासाठी १० कोटी
अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्रीक्षेत्र मोझरी येथे मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १०.३१ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. विकास आराखड्यांतर्गत मोठी बांधकामे करण्यासाठी हा निधी विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आला आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मतिथीस १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ श्रीक्षेत्र मोझरी विकास आराखडा मंजूर करण्यात आला. सुधारित आराखड्यानुसार सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील कामांसाठी १५०.८३ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. त्यातील १०.०३१ कोटी रुपये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मिळाले आहेत.
हा निधी वितरणाची संपूर्ण जबाबदारी विभागीय आयुक्तांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. (प्रतिनिधी)