तुटलेल्या तारांनी घेतला १० दुभत्या जनावरांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 21:28 IST2020-06-12T21:27:14+5:302020-06-12T21:28:38+5:30

जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने नजीकच्या रहाटगाव परिसरात शुक्रवारी दुपारी दहा दुभत्या जनावरे दगावली.

10 Animals death in Amravati | तुटलेल्या तारांनी घेतला १० दुभत्या जनावरांचा बळी

तुटलेल्या तारांनी घेतला १० दुभत्या जनावरांचा बळी

अमरावती - जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने नजीकच्या रहाटगाव परिसरात शुक्रवारी दुपारी दहा दुभत्या जनावरे दगावली. रहाटगाव परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे जिवंंत विद्युत तारा जमिनीवर  तुटून पडल्या. या घटनेत खरबडे नामक व्यक्तीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दगावलेल्या जनावरांमध्ये तीन गाई व  सात म्हशी होत्या. घटनेची माहिती पोलिसांसह महावितरणला देण्यात आली. त्यानंतर या भागातील विद्युत पुरवठा खंडित करून तातडीने तुटलेल्या तारा जोडण्यात आल्या. नांदगावपेठ पोलिसांनी पंचनामा केला. महावितरणच्या अधिकाºयांनीसुद्धा घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास ठाणेदार दिलीप चव्हाण करीत आहेत. 
 

Web Title: 10 Animals death in Amravati