चाकूचा धाक दाखवून तरुणाचे १ लाख ९० हजार लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:10 IST2021-06-26T04:10:56+5:302021-06-26T04:10:56+5:30

अमरावती : चाकूचा धाक दाखवित अमरावती-बडनेरा मार्गावर राजापेठनजीक तीन जणांनी एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडून १ लाख ९० हजार ...

1 lakh 90 thousand of the youth was robbed by showing fear of knife | चाकूचा धाक दाखवून तरुणाचे १ लाख ९० हजार लुटले

चाकूचा धाक दाखवून तरुणाचे १ लाख ९० हजार लुटले

अमरावती : चाकूचा धाक दाखवित अमरावती-बडनेरा मार्गावर राजापेठनजीक तीन जणांनी एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडून १ लाख ९० हजार रुपये लुटले. ही धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास जय इंडस्ट्रीजसमोर घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

साबणपुऱ्यातील रहिवासी नितीन रमेश साहू (३७) हे गुरुवारी सायंकाळी काम आटोपून दुचाकीने बडनेरा रोडवरून घरी जात होता. यादरम्यान बडनेरा रोडवरील देवरणकरनगर स्थित जय इंडस्ट्रीजजवळ ते लघुशंकेकरिता थांबले. त्यावेळी तिन अनोळखी इसमांनी नितीन साहू यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांच्याजवळील २२ हजार ६०० रुपयांची रोख, मोबाईल, १७ ग्रॅमची सोन्याची चैन व १५ ग्रॅमची अंगुठी जबरीने हिसकावून घेतली. त्यानंतर लुटारूनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेच्या माहितीवरून राजापेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत नितीन हे जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी निघून गेले होते. पोलिसांनी चौकशी करून रुग्णालयात जाऊन नितीन साहुची भेट घेतली. त्यानंतर नितीनने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे

Web Title: 1 lakh 90 thousand of the youth was robbed by showing fear of knife