शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जियाउल्लासह महवीशची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

लालखडी स्थित मदरशात झालेल्या मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी मुख्य आरोपी जिया खानला अटक करून, त्याची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली. मात्र, त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा केले आहेत.

ठळक मुद्देव्हॉइस रेकॉर्डिंग प्रयोगशाळेत : फिरदौसची कोठडी २२ नोव्हेंबरला संपणार

अमरावती : मदरशातील मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी जियाउल्ला खान व महवीश खान अहमद खान यांची न्यायालयाने बुधवारी ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. नागपुरी गेट पोलिसांनी जियाउल्ला खानची पंधरा दिवस पोलीस कोठडीत चौकशी केली. मात्र, गुन्ह्याची कबुली त्याने दिली नाही. जियाउल्लाची सहकारी फिरदौसजहाँची २२ नोव्हेंबर रोजी पोलीस कोठडी संपणार आहे.लालखडी स्थित मदरशात झालेल्या मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी मुख्य आरोपी जिया खानला अटक करून, त्याची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली. मात्र, त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा केले आहेत. जियाउल्ला व महवीश यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर नागपुरी गेट पोलिसांनी दोघांनाही तगड्या बंदोबस्तात बुधवारी न्यायालयात आणले. तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालय (१) चे न्यायाधीश ए.व्ही. कुळकर्णी यांच्यापुढे त्यांना हजर केले. पोलिसांनी त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करून ४ डिसेंबरपर्यंत दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. जियाउल्ला खानकडून वकील परवेज खान व महवीश खानकडून वकील प्रशांत देशपांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.व्हॉइस रेकॉर्डिंगचे नमुने घेतलेजियाउल्ला खानच्या समर्थनार्थ मदरशातील मुलींचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या महवीशच्या आवाजाचे नमुने पोलिसांनी घेतले. त्या आवाजाची पडताळणीसाठी स्पेक्ट्रोग्राफी अ‍ॅनालिसीसद्वारे केला जाणार आहे. ते नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे.पीडित मुलीचे कलम १६४ नुसार न्यायालयासमक्ष बयाण नोंदविण्यात आले आहे. महिला आरोपीच्या व्हाईस रेकॉडिंगचे नमुने घेण्यात आले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले.- यशवंत सोळंकेपोलीस उपायुक्त.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हा