जि.प. पदाधिकाऱ्यांच्या गटातील ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:17 IST2020-12-24T04:17:55+5:302020-12-24T04:17:55+5:30
जि.प. अध्यक्ष यांच्या गावातील भांबेरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भांबेरी गाव सुरुवातीपासून तालुक्याच्या राजकारणात ...

जि.प. पदाधिकाऱ्यांच्या गटातील ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा
जि.प. अध्यक्ष यांच्या गावातील भांबेरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भांबेरी गाव सुरुवातीपासून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहे. आता तर या गावच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा भोजने या जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्याकरिता भांबेरी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. यापूर्वी या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. आता मात्र भारतीय जनता पक्ष सुद्धा निवडणुकीत उतरणार असल्याने जरी मागील सरपंच, उपसरपंच राष्ट्रवादीचे असले तरी ऐनवेळी सरळ सरळ वंचित बहुजन आघाडी व भाजप यांच्यात लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र आज तिहेरी रंगत पाहावयास मिळत आहे असेच चित्र इतर पदाधिकाऱ्यांच्या गटात असल्याने ही निवडणूक त्त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.