शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

वाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 13:26 IST

मंडळाच्या राज्यस्तरीय मूल्यांकन समितीने जिल्ह्यातील १७ पैकी पाच शाळांचे बाह्यमूल्यांकन केले. या मूल्यांकनात वाडेगाव येथील जिल्हा परिषद मुलांची शाळेने बाजी मारली

अकोला: महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या संलग्नतेसाठी जिल्ह्यातील १७ शाळांनी अर्ज केले होते. मंडळाच्या राज्यस्तरीय मूल्यांकन समितीने जिल्ह्यातील १७ पैकी पाच शाळांचे बाह्यमूल्यांकन केले. या मूल्यांकनात वाडेगाव येथील जिल्हा परिषद मुलांची शाळेने बाजी मारली. आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणून संलग्नता देण्यास आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने मान्यता दिल्याचे पत्र मुख्याध्यापकांना बुधवारी प्राप्त झाले.डिजिटल शाळेसोबत वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता देत, तेथील गुणवंत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भौतिक सुविधा, अभ्यासक्रम, प्रशिक्षित शिक्षक मिळावे, या दृष्टिकोनातून शासनाने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना केली. या मंडळाची संलग्नता देऊन आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देण्यासाठी मंडळाने आॅनलाइन अर्ज मागविले होते. यात जिल्ह्यातील पाच शाळांची मंडळाने निवड केली. या पाच शाळांच्या बाह्यमूल्यांकनासाठी राज्यस्तरीय शाळा मूल्यांकन समितीच्या सहा सदस्यीय चमूने ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान पाच शाळांची तपासणी केली. तपासणीमध्ये वाडेगाव येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेने आंतरराष्ट्रीय शाळा संलग्नतेसाठी आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण केल्यामुळे या शाळेला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने पुढील तीन वर्षांपासून अस्थायी संलग्नता प्रदान केली आहे. त्यामुळे या शाळेला आता १० कोटी रुपयांचे अनुदान मिळेल आणि ग्रामीण भागातील मुलामुलींना आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार शिक्षण मिळणार आहे. आंतराष्ट्रीय मंडळाची संलग्नता मिळविण्यासाठी जि.प. सदस्य हिंमतराव घाटोळ, पं.स. सदस्य प्रशांत मानकर, शाळा समिती अध्यक्ष संतोष काळे, उपाध्यक्ष डॉ. चाँद यांच्यासह ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळाले. (प्रतिनिधी) शाळेत कॉन्व्हेंट सुरू होणार!आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाल्यामुळे वाडेगाव जि.प. शाळेत आता नर्सरी, केजी १, केजी २ पर्यंत कॉन्व्हेंट सुरू होईल. पहिल्या टप्प्यामध्ये नर्सरी ते इ. चौथीतील विद्यार्थ्यांना मंडळाच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार शिक्षण मिळणार आहे.गतवर्षी जिल्ह्यातील एकाही शाळेला आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाली नाही; परंतु यंदा ही संलग्नता मिळविण्यात यश मिळाले. मिळालेला बहुमान शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी तेथील शिक्षक, मुख्याध्यापकांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत.-डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्यजिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था

शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे परिश्रम आणि लोकसहभागामुळे शाळा डिजिटल झाली. आता शाळेला आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाल्यामुळे शाळेमध्ये मंडळाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम शिकविला जाईल. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना मिळेल.-समाधान सोर, मुख्याध्यापकजिल्हा परिषद मराठी शाळा, वाडेगाव

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा