झोन कार्यालये वा-यावर

By Admin | Updated: November 22, 2014 01:50 IST2014-11-22T01:50:42+5:302014-11-22T01:50:42+5:30

अकोला मनपा क्षेत्रीय अधिका-यांचा पत्ता नाही!

Zone Offices | झोन कार्यालये वा-यावर

झोन कार्यालये वा-यावर

अकोला: सर्वसामान्य नागरिकांची विविध कामे तत्काळ मार्गी लावण्यासाठी क्षेत्रीय (झोन) कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. आयुक्त डॉ.कल्याणकर तसेच उपायुक्त चिंचोलीकर यांनी क्षेत्रीय अधिकार्‍यांना झोन कार्यालयात कार्यरत राहण्याचे आदेश दिले असले, तरी संबंधित चारही क्षेत्रीय अधिकारी कार्यालयात थांबतच नसल्याचे ह्यलोकमतह्णने शुक्रवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान समोर आले. मनपा आवारात सर्व विभाग एकवटल्या गेल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी होते, ही बाब लक्षात आल्याने तत्कालीन आयुक्त डॉ.विपीनकुमार शर्मा यांनी झोन कार्यालयांची निर्मिती केली. पूर्व झोनमध्ये रतनलाल प्लॉटस्थित मनपा मराठी मुलांची शाळा क्र.१५, पश्‍चिम झोन अंतर्गत डाबकी रोडवरील मनपा शाळा क्र.२, उत्तर झोनमध्ये रेल्वे स्टेशन चौकातील मनपा हिंदी मुलांची शाळा क्र.४ व दक्षिण झोन अंतर्गत सिंधी कॅम्पस्थित मनपा संकुलमध्ये कार्यालये उघडण्यात आली. क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या दिमतीला बांधकाम विभाग, जलप्रदाय, मालमत्ता कर विभाग, विद्युत तसेच स्वच्छता विभागाचे कर्मचारी देण्यात आले. त्या-त्या क्षेत्रातील नागरिकांनी संबंधित कार्यालयात जाऊन काम पूर्ण करावे, ही अपेक्षा होती. आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या कालावधीत प्रशासकीय कामकाजात गती येण्यासह नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत असल्याचा दावा होत असला, तरी वस्तुस्थिती निराळी आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दबावात क्षेत्रीय अधिकार्‍यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दक्षिण झोन वगळता उर्वरित तीन कार्यालयात क्षेत्रीय अधिकारी उपस्थित नसल्याचे समोर आले.

Web Title: Zone Offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.