झिंगराजी महाराज यात्रा महोत्सव रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:23 IST2021-02-25T04:23:43+5:302021-02-25T04:23:43+5:30

----------------------------------- वाडेगाव-माझोड रस्त्यावर खड्डेच खड्डे वाडेगाव: वाडेगाव-माझोड रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनधारकांना ...

Zingaraji Maharaj Yatra Festival canceled! | झिंगराजी महाराज यात्रा महोत्सव रद्द!

झिंगराजी महाराज यात्रा महोत्सव रद्द!

-----------------------------------

वाडेगाव-माझोड रस्त्यावर खड्डेच खड्डे

वाडेगाव: वाडेगाव-माझोड रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनधारकांना वाहन चालवितांना कसरत करावी लागत आहे. याकडे लक्ष देऊन या रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी होत आहे.

-----------------------------

दिग्रस बु. परिसरात अवैध वृक्षतोड

दिग्रस बु.: परिसरात अवैध वृक्षतोड वाढली असून, याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. परिसरात लाकूड माफियांकडून हिरव्या वृक्षांची कत्तल होत आहे. याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमिंकडून होत आहे.

------------------------------

वन्य प्राण्यांचा हैदोस; शेतकरी हैराण

बाळापूर: तालुक्यातील नया अंदुरा, लोणाग्रा, हातरूण परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकरी संकटात सापडले आहे. रात्रीच्या सुमारास वन्य प्राणी गव्हाच्या शेतात शिरुन नुकसान करीत असल्याचे चित्र आहे.

-------------------

डाबकी-निमकर्दा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

बाळापूर: डाबकी-निमकर्दा रस्त्यावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच धुळीमुळे रस्त्यालगत असलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्यावर पाणी टाकण्याची मागणी होत आहे.

Web Title: Zingaraji Maharaj Yatra Festival canceled!