जिल्हा परिषद कर्मचारी भरती शासनच करणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:09 IST2017-08-25T01:09:46+5:302017-08-25T01:09:46+5:30
अकोला : जिल्हा परिषदेतील वर्ग-३ मधील कर्मचार्यांच्या रिक्त पदांची भरती आता शासनाकडूनच केली जाणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समि तीऐवजी शासन ऑनलाइन परीक्षेतून ही निवड करणार आहे. त्याचवेळी इतर विभागाची भरती या समितीकडून केली जाणार आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी भरती शासनच करणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषदेतील वर्ग-३ मधील कर्मचार्यांच्या रिक्त पदांची भरती आता शासनाकडूनच केली जाणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समि तीऐवजी शासन ऑनलाइन परीक्षेतून ही निवड करणार आहे. त्याचवेळी इतर विभागाची भरती या समितीकडून केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेत नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-क संवर्गातील पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. त्यासाठी संबंधित जिल्हय़ाच्या जिल्हाधिकार्यांना अध्यक्ष या नात्याने बराच वेळ देत श्रम करावे लागतात. त्याचा परिणाम इतर कामांवर होतो. त्यामुळे जिल्हा परिषदेतील वर्ग-३ मधील कर्मचार्यांची भरती ऑनलाइन करण्याची तयारी शासनाने केली. त्यानुसारच २४ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयात जिल्हा निवड समितीकडून ही निवड प्रक्रिया काढून घेण्यात आली.
यापुढे उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेऊन गुणवत्ता यादी राज्य स् तरावर तयार होणार आहे. त्यासाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणत्या जिल्हय़ात नियुक्ती हवी आहे, त्यासाठी १ ते ३४ जिल्हा परिषदांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. त्यातून निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी त्या उमेदवारांच्या मूळ जिल्हय़ातील मुख्य कार्यकारी अधिकारी करतील. पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे तसेच गुणानुसार जिल्हानिहाय नियुक्ती दिली जाणार आहे.