तेल्हारा पंचायत समिती सभापती पदाचा प्रभार जिल्हा परिषद समाजकल्याण सभापतींकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST2021-03-27T04:19:24+5:302021-03-27T04:19:24+5:30

अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापती पदाचा प्रभार जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्याकडे देण्यात ...

Zilla Parishad Social Welfare Chairperson in charge of Telhara Panchayat Samiti Chairperson's post! | तेल्हारा पंचायत समिती सभापती पदाचा प्रभार जिल्हा परिषद समाजकल्याण सभापतींकडे!

तेल्हारा पंचायत समिती सभापती पदाचा प्रभार जिल्हा परिषद समाजकल्याण सभापतींकडे!

अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापती पदाचा प्रभार जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्याकडे देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी शुक्रवारी दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून (ओबीसी) निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांसह जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या २८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामध्ये तेल्हारा पंचायत समितीच्या सभापतींचा समावेश आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या तेल्हारा पंचायत समिती सभापती पदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी २६ मार्च रोजी दिला. त्यानुसार जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट तेल्हारा पंचायत समिती सभापती पदाचा अतिरिक्त प्रभार स्वीकारणार आहेत.

मंगळवारी स्वीकारणार

प्रभार- आकाश शिरसाट

तेल्हारा पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या सभापती पदाचा अतिरिक्त प्रभार मंगळवारी ३० मार्च रोजी स्वीकारणार असल्याचे जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट यांनी सांगितले.

...........फोटो.........................

Web Title: Zilla Parishad Social Welfare Chairperson in charge of Telhara Panchayat Samiti Chairperson's post!