अनैतिक संबंधातून युवकाचा खून

By Admin | Updated: June 10, 2017 02:35 IST2017-06-10T02:35:53+5:302017-06-10T02:35:53+5:30

अनैतिक संबंधातून युवकाची सुरा भोसकून हत्या केल्याची घटना बाश्रीटाकळी तालुक्यातील रेडवा येथे घडली.

Youth's murder in relation to immorality | अनैतिक संबंधातून युवकाचा खून

अनैतिक संबंधातून युवकाचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
बाश्रीटाकळी: अनैतिक संबंधातून युवकाची सुरा भोसकून हत्या केल्याची घटना बाश्रीटाकळी तालु क्यातील रेडवा येथे ८ जून रोजी रात्री घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध बाश्रीटाकळी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार रेडवा येथील नागेश गोवर्धन राठोड या युवकाचे गावातीलच एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. याची कुणकुण लागताच महिलेचा पती रोहिदास जाधव याने नागेश राठोडला समजावून सांगण्यासाठी गावातील मुख्य रस्त्यावर नेले. तेथे दोघांमध्ये याच विषयावर जोरदार वाद झाला. या वादातून रोहिदास जाधव याने नागेश राठोडवर सुर्‍याने वार केला. घटनेची माहिती गावात पसरताच रोहिदास जाधवने गावातून पळ काढला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नागेश राठोडला त्याच्या नातेवाइकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय, बाश्रीटाकळी येथे हलवले. तेथून डॉ क्टरांनी त्याला सवरेपचार रुग्णालय, अकोला येथे नेण्याचा सल्ला दिला. त्याला अकोला येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोवर्धन राठोड यांच्या फिर्यादीवरून बाश्रीटाकळी पोलिसांनी आरोपी रोहिदास जाधवविरुद्ध कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून, पुढील तपास ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय कोरसचे, जमादार संजय सोनवणे, संतोष वाघमारे करीत आहेत.

Web Title: Youth's murder in relation to immorality