विद्युत प्रवाहाच्या धक्कय़ाने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 20:01 IST2017-10-01T20:00:46+5:302017-10-01T20:01:22+5:30
मूर्तिजापूर : स्थानिक तेलीपुरा भागात राहणार्या २४ वर्षीय युवकास विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना ३0 सप्टेंबर रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली.

विद्युत प्रवाहाच्या धक्कय़ाने युवकाचा मृत्यू
ठळक मुद्देतेलीपुरा भागातील घटनापाण्याची मोटार लावत असताना लागला विजेचा धक्का
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : स्थानिक तेलीपुरा भागात राहणार्या २४ वर्षीय युवकास विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना ३0 सप्टेंबर रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली.
तेलीपुरा येथील रहिवासी असलेला नागेश महादेव अजमिरे (२४) हा त्याच्या घरी पाणी भरण्यासाठी शनिवारी दुपारी पाण्याची मोटार लावत असताना त्याला विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसून, तो बाजुला फेकला गेला. त्यामुळे त्याच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना दसर्याच्या दिवशीच घडली. या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
-