समाज, राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे!

By Admin | Updated: December 24, 2015 02:49 IST2015-12-24T02:49:40+5:302015-12-24T02:49:40+5:30

गायत्री महायज्ञात विरेश्‍वर उपाध्याय यांचे प्रतिपादन.

Youth's contribution is important for the progress of the society and nation. | समाज, राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे!

समाज, राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे!

अकोला: विज्ञान युगात येणारा प्रत्येक क्षण परिवर्तनशील आहे. परिवर्तनासोबत येणार्‍या संकटांना धैर्याने तोंड देण्याची गरज आहे. त्यासाठी उत्साही व सक्षम युवकांची आवश्यकता आहे. समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन शांतीकुंज हरिद्वार येथील विरेश्‍वर उपाध्याय यांनी बुधवारी येथे केले. अखिल भारतीय गायत्री परिवार, शांतीकुंज हरिद्वार यांच्या वतीने येथील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात २२ डिसेंबरपासून १0८ कुंडीय गायत्री महायज्ञास सुरुवात झाली. विद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या ह्यभक्तिधामह्णमध्ये तयार करण्यात आलेल्या १0८ यज्ञकुंडांमध्ये गायत्री मंत्रोच्चारात विविध गावांमधून आलेल्या शेकडो दाम्पत्यांनी बुधवारी दुसर्‍या दिवशीही आहुती अर्पण केली. दुपारच्या सत्रात विरेश्‍वर उपाध्याय यांचे ह्यशिक्षा के साथ विद्या भीह्ण या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना विरेश्‍वर उपाध्याय म्हणाले, की आजच्या धावपळीच्या युगात मानवाने जगण्याची परिभाषाच बदलून टाकली आहे. काहींनी अनैतिक व्यवहार स्वीकारले असून, कमी श्रमात जास्त पैसा कमविण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. ज्या लोकांमध्ये संयम व धैर्य असते, त्यांना गायत्री देवतेचा आशीर्वाद लाभतो. गायत्री देवीचे वाहन हंस आहे. हंसात दूध आणि पाणी वेगवेगळे करण्याचा गुण आहे. म्हणून आजच्या युगात हंसाचा हा गुण मनुष्याने आत्मसात केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Web Title: Youth's contribution is important for the progress of the society and nation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.