काटेपूर्णा नदीच्या पुरात युवक वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 11:21 IST2020-09-18T11:20:52+5:302020-09-18T11:21:10+5:30

पुर्वेश सुभाष हेंडजकर (२४ ) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.

The youth was swept away in the floods of Katepurna river | काटेपूर्णा नदीच्या पुरात युवक वाहून गेला

काटेपूर्णा नदीच्या पुरात युवक वाहून गेला

मूर्तिजापूर : तालुक्यातील भटोरी येथील युवक दुपारी १ वाजताच्या सुमारास काटेपुर्णा नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी घडली. पुर्वेश सुभाष हेंडजकर (२४ ) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.
                पुर्वेश हा दुपारी १२ वाजता गावालगत असलेल्या नदी काठी बैल चारण्यासाठी गेला.  बैल चारत असताना दुपारी १ वाजताच्या दरम्यान अचानक त्याचा पाय घसरल्याने तो थेट नदीपात्रात जावून पडला.  नदीला मोठा पुर असल्याने त्यात तो वाहून गेला. त्याचा स्थानिक लोकांनी शोध घेतला असता तो कुठेही मिळून आला नाही.  पिंजर येथील गाडगे बाबा आपत्कालीन पथकाच्या साहाय्याने त्याचा शोध घेण्याचे कार्य दिवसभर सुरु होते दिवसभरात निदीत ३ किलोमीटर पर्यंत शोध घेतल्या नंतरही तो मिळून आला नाही. घटनास्थळी निवासी नायब तहसीलदार राजू डाबेराव व कर्मचारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाल भावाने गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे दिपक सदाफळे यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून संध्याकाळी उशीरापर्यंत शोध कार्य सुरू होते.(शहर प्रतिनिधी )

Web Title: The youth was swept away in the floods of Katepurna river