युवकाला लुटले; अल्पवयीन मुलगा ताब्यात

By Admin | Updated: July 15, 2017 01:34 IST2017-07-15T01:34:11+5:302017-07-15T01:34:11+5:30

अकोला: अकोटला जाण्यासाठी निघालेल्या युवकाला मारहाण करण्याचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाइल व रोख हजार रुपये हिसकावून घेतल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास अकोट रोडवर घडली.

The youth was robbed In possession of a minor boy | युवकाला लुटले; अल्पवयीन मुलगा ताब्यात

युवकाला लुटले; अल्पवयीन मुलगा ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोटला जाण्यासाठी निघालेल्या युवकाला मारहाण करण्याचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाइल व रोख हजार रुपये हिसकावून घेतल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास अकोट रोडवर घडली. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका अल्पवयीन मुलास अटक केली.
अडगाव बु. येथे राहणारे गणेश दत्तात्रय वाघमारे (३४) हे आपल्या मित्रांसह मोटारसायकलने अकोटला जात असताना, दोघा अल्पवयीन मुलांनी त्यांची मोटारसायकल अकोट रोडवरील प्रकाश हार्डवेअरजवळ अडविली आणि काठीने मारहाण करण्याची धमकी देत, त्यांच्याकडील मोबाइल व रोख ६ हजार रुपये हिसकावून घेतले. गणेश वाघमारे यांच्या तक्रारीनुसार अकोट फैल पोलिसांनी भादंवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल करून एका अल्पवयीन मुलास अटक केली. त्याच्याकडून मोबाइल व रोख रक्कम जप्त केली. या मुलाचा साथीदार फरार झाला.

Web Title: The youth was robbed In possession of a minor boy