गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:32 IST2017-10-09T20:31:49+5:302017-10-09T20:32:13+5:30
मूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती तेलीपुरा येथे राहणार्या एका ३५ वर्षीय युवकाने राहत्या घरी ९ ऑक्टोबर रोजी ९.३0 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती तेलीपुरा येथे राहणार्या एका ३५ वर्षीय युवकाने राहत्या घरी ९ ऑक्टोबर रोजी ९.३0 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
जुनी वस्ती तेलीपुरा येथील रहिवासी असलेल्या अनिलचंद्र आ प्पा खंडारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याचा चुलत भाऊ घनश्याम शिवलिंग आप्पा खंडारे (३५) याने ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३0 वाजतापूर्वी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद दिल्यावरून शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीकरिता दलेसा रुग्णालयात दाखल करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास सुरू आहे.