तरुणांनी संवेदनशीलतेसोबतच संयम ठेवावा : राजन वेळूकर
By Admin | Updated: December 25, 2016 02:44 IST2016-12-25T02:44:58+5:302016-12-25T02:44:58+5:30
श्री शिवाजी महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

तरुणांनी संवेदनशीलतेसोबतच संयम ठेवावा : राजन वेळूकर
अकोला, दि. २४- २१ व्या शतकात पदार्पण करताना खूप मोठी स्पर्धा राहणार आहे. त्या स्पर्धेत तरुणांनी एकट्याने सफलता मिळवून चालणार नाही. सगळ्य़ांना घेऊन चालण्यासोबतच तरुणांनी संवेदनशीलतेसोबतच संयम बाळगायला हवा, असे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी येथे सांगितले. डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती व स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
संमेलनाचे उद्घाटन डॉ. वेळूकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे होते. अतिथी म्हणून राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे सल्लागार अंबादास मोहिते उपस्थित होते. मंचावर उपप्राचार्य डॉ. एस.पी.रोठे, प्रा.डॉ. एम.आर. इंगळे, डॉ. आशिष राऊत, डॉ. अनिल राऊत, डॉ. उल्हास मेडशीकर उपस्थित होते.
पुढे बोलताना, डॉ. वेळूकर यांनी कार्यक्रम वीर जवानांना सर्मपित केला आहे, तर भारतीय जवानांचा खंबीरपणा व प्रामाणिकपणा हा गुण तरुणांनी आत्मसात केला पाहिजे. देशातील सर्व लढाया युवाशक्तीच्या जोरावरच झाल्या आहेत. युवकांचे सार्मथ्य आणि बुद्धीच्या जोरावरच देश महासत्ता होऊ शकतो, असा विश्वासही व्यक्त केला. शिक्षणाने माणसामध्ये विनम्रता आली नाही, तर ते बिनकामाचे समजावे, असेही ते म्हणाले.
ह्यरुसाह्णचे सल्लागार अंबादास मोहिते यांनी आज समाज व देशाची स्थिती अंत्यत गंभीर आहे. २१ व्या शतकातदेखील आपण जात-पात, धर्म यामध्ये एवढे अडकून पडलो, की देशाचे तुकडे व्हायची वेळ आली आहे. केवळ देशाच्या संविधानामुळे देश अखंड आहे. त्यासाठी आजच्या युवापिढीने जाती-पातीच्या बेड्या फेकून देऊन समतामुलक समाजाची रचना करणे, मानवता धर्म बाळगण्याचा उद्देश ठेवावा, आपल्याला कॅशलेस नव्हे, तर ह्यकास्टलेसह्ण सोसायटी हवी, असेही ते म्हणाले.
प्राचार्य डॉ. भडांगे यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण आणि वसतिगृह सुविधा आहे. ती यापुढे शहीद जवानांच्या मुलांसाठीही असेल, असे सांगितले.
प्रास्ताविक कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. प्रतीक्षा कोकाटे यांनी केले. यावेळी प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झालेली अनुराधा ठाकरे, बॉक्सिंगसाठी निवड झालेले ऋत्विक शिंदे, अजय पेंदोर यांचा सत्कार करण्यात आला. संचालन विद्यार्थी विशाल नंदागवळी यांनी, तर आभार प्राजक्ता सवाई यांनी मानले.