अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत युवक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:16 IST2020-12-23T04:16:33+5:302020-12-23T04:16:33+5:30

मूर्तिजापूर : अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना २२ डिसेंबर राेजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील ...

Youth seriously injured in an unidentified tractor collision | अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत युवक गंभीर

अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत युवक गंभीर

मूर्तिजापूर : अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना २२ डिसेंबर राेजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपासमोर घडली. विनीत गजानन गडवे (२२, रा. हिरपूर) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

हिरपूर येथील रहिवासी विनीत गजानन गडवे (२२) हा कामानिमित्ताने नवसाळ येथे या दुचाकीने (एमएच ३० आर १२३९) राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना शेतातून रस्त्यावर येणाऱ्या एका अज्ञात भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाने जखमीस तातडीने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. जखमी विनीत गडवे अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.

Web Title: Youth seriously injured in an unidentified tractor collision