शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भामट्याने सेवानिवृत्त शिक्षकाची दुचाकी पळवीली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 13:38 IST

अकोला - रस्त्याने जाणारा एक जण सेवानिवृत्त नागरिकाच्या दुचाकीसमोर आला. त्याने दुचाकीचा धक्का लागला म्हणून त्याच्या हातातील मोबाइल खाली पाडला. मोबाइल दुरुस्त करून द्या, असे म्हणून तोच दुकानात घेऊन गेला. सेवानिवृत्त नागरिक दुकानदारासोबत मोबाइल दुरुस्तीविषयी बोलत असताना युवक दुचाकी घेऊन पसार झाला.

ठळक मुद्देतांदळी येथील सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र कचरू भोरे हे त्यांच्या दुचाकीने कामानिमीत्त अकोला येथे आले होते. जनता भाजी बाजारातून दुचाकीने जात असता समोरून चालत येणाऱ्या इसमाच्या हाताला धक्का लागला व त्याचा मोबाइल खाली पडला. रामचंद्र भोरे दुकानाच्या बाहेर आले तर त्यांना दुचाकी आणि इसम दिसला नाही.

अकोला - रस्त्याने जाणारा एक जण सेवानिवृत्त नागरिकाच्या दुचाकीसमोर आला. त्याने दुचाकीचा धक्का लागला म्हणून त्याच्या हातातील मोबाइल खाली पाडला. मोबाइल दुरुस्त करून द्या, असे म्हणून तोच दुकानात घेऊन गेला. सेवानिवृत्त नागरिक दुकानदारासोबत मोबाइल दुरुस्तीविषयी बोलत असताना युवक दुचाकी घेऊन पसार झाला.पातूर तालुक्यातील तांदळी येथील सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र कचरू भोरे हे त्यांच्या दुचाकीने कामानिमीत्त अकोला येथे आले होते. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान जनता भाजी बाजारातून दुचाकीने जात असता समोरून चालत येणाऱ्या इसमाच्या हाताला धक्का लागला व त्याचा मोबाइल खाली पडला. तुमच्यामुळे मोबाइल पडला आता दुरुस्त करून द्या असे तो म्हणाला. माणुसकीच्या नात्याने रामचंद्र भोरे यांनी त्याला दुचाकीवर बसवले व मोबाइल दुरुस्तीच्या दुकानात घेऊन गेले. मात्र दुकानदाराने मोबाइल दुरुस्त होत नाही असे म्हटले. त्यानंतर सोबतच्या इसमाने रामचंद्र भोरे यांना दुचाकीवर मागे बसवले व नवीन बसस्थानकाचे मागील बाजूस असलेल्या श्री मोबाइल रिपेंरिंगच्या दुकानासमोर आणले. रामचंद्र भोरे हे दुचाकीखाली उतरून मोबाइल दुरुस्तीसाठी दुकानात गेले व नादुरूस्त मोबाइल दुकानदाराला दाखविला. मात्र त्यांच्या सोबत असणारा इसम हा दुचाकीवरच बसून होता. मोबाइल बघितल्यावर तो दुरुस्त होत नाही, असे दुकानदाराने म्हटल्यानंतर रामचंद्र भोरे दुकानाच्या बाहेर आले तर त्यांना दुचाकी आणि इसम दिसला नाही. त्यांनी आजुबाजुला शोध घेतल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरPoliceपोलिसCrimeगुन्हा