अल्पवयीन मुलीचे शोषण करणारा युवक कारागृहात

By Admin | Updated: May 28, 2014 01:15 IST2014-05-28T00:57:28+5:302014-05-28T01:15:49+5:30

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या युवकाची कारागृहात रवानगी.

Youth prisoner who exploited a minor girl | अल्पवयीन मुलीचे शोषण करणारा युवक कारागृहात

अल्पवयीन मुलीचे शोषण करणारा युवक कारागृहात

अकोला : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करणार्‍या युवकास खदान पोलिसांनी मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. मलकापूर परिसरात राहणारा कैलास हिरामण सावळे (३२) या विवाहित युवकाने परिसरातीलच एका १५ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गुजरातमध्ये पळवून नेले. कैलास सावळे याने आपल्या मुलीला पळवून नेल्याची तक्रार अडीच महिन्यांपूर्वी तिच्या कुटुंबीयांनी खदान पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तब्बल दोन-अडीच महिने अल्पवयीन मुलीचे शोषण केल्यानंतर तो मुलीला घेऊन अकोल्यात परत आला. ही माहिती खदान पोलिसांना मिळताच त्यांनी २३ मे रोजी दुपारी त्याला गजाआड केले. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.

Web Title: Youth prisoner who exploited a minor girl