भरधाव दुचाकीच्या धडकेत युवक ठार, तीन जखमी
By Admin | Updated: July 18, 2016 23:42 IST2016-07-18T23:42:45+5:302016-07-18T23:42:45+5:30
पोलीस भरतीसाठी सराव करत असताना घडला अपघात.

भरधाव दुचाकीच्या धडकेत युवक ठार, तीन जखमी
बुलडाणा : भरधाव दुचाकीने धडक दिल्याने पोलीस भरतीसाठी सराव करीत असणारा पादचारी युवक ठार झाला तर त्याचे अन्य तीन सोबती जखमी झाले. ही घटना १८ जुलै रोजी सायंकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास घडली.
तालुक्यातील पळसखेड नागो येथील अंकुश राम मानकर (१८), दिपक दिवाकर बनसोड (१८), सागर मनोहर सुरडकर (२0) व राजदिप केशवराव हेलोडे (२२) हे चार जण पोलीस भरतीसाठी नित्यनियमाप्रमाणे सायंकाळी धावण्याचा सराव करत असताना भरधाव वेगात येणार्या गजानन कारेकर रा.पाडळी यांच्या दुचाकीने या युवकांना धडक दिली. त्यामध्ये अंकुश मानकर हा ठार झाला. तर दिपक दिवाकर बनसोड, सागर मनोहर सुरडकर व राजदीप केशवराव हेलोडे हे जखमी झाले आहेत. जखमींना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.