बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी
By Admin | Updated: June 30, 2016 00:18 IST2016-06-30T00:18:50+5:302016-06-30T00:18:50+5:30
वाशिम जिल्ह्यातील कामरगाव परिसरात बिबटाचा वावर.

बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी
कामरगाव (जि. वाशिम) : परिसरातील बेंबळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी झल्याची घटना बुधवारी घडली. दरम्यान, वनविभागाच्या अधिकार्यांनी बिबट्याला पकडून काटेपूर्णा अभयारण्यात सोडून दिले. बेंबळा शिवारात मदनसिंह बयस यांच्या शेतात बुधवारी मजुरांना बिबट्या आढळला. बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी गावातील काही युवक शेतात गेले. यावेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने चेतन खोपे या युवकावर हल्ला चढविला. बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाला. दरम्यान जवळच असलेल्या पुलाखाली बसला. नागरिकांनी पुलाची दोन्ही तोेंडे बंद करुन वनविभागाला माहीती दिली. वनविभागाने शिताफीने बिबट्याल जाळ्य़ात पकडून काटपूर्णा अभयारण्यात सोडले.