पोलीस ठाण्यात घेतले युवकाने विष

By Admin | Updated: July 1, 2015 01:38 IST2015-07-01T01:38:49+5:302015-07-01T01:38:49+5:30

सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या आवारातच युवकाने केले विषारी औषध प्राशन.

Youth gets poison from the police station | पोलीस ठाण्यात घेतले युवकाने विष

पोलीस ठाण्यात घेतले युवकाने विष

अकोला - फत्तेपूरवाडी येथील रहिवासी, एका ३२ वर्षीय युवकाने सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या आवारातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास घडली. या परिसराच्या बिट जमादाराने धाकदपट केल्यामुळे युवकाने हे पाऊल उचल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली. या युवकावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या फत्तेपूरवाडी येथील श्याम पुरुषोत्तम मिश्रा (३२) यांच्याशी या परिसराच्या बिट जमादाराने वाद घातल्यानंतर श्याम मिश्रा यांनी सोमवारी रात्री ९ वाजून ३0 मिनिटांच्या सुमारास सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या आवारात विष प्राशन केले. या प्रकारामुळे सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकार्‍यांनी ठाण्यात धाव घेऊन युवकास सवरेपचार रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी दिली. यावेळी श्याम मिश्रा यांच्या कुटुंबीयांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाणे व नंतर सवरेपचार रुग्णालय गाठून श्याम मिश्रा यांच्यावर विष प्राशनाची वेळ आणणार्‍या दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. यासंदर्भात ठाणेदार डी.डी. ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Youth gets poison from the police station