आलेगाव येथील युवकाने घेतले विष

By Admin | Updated: July 13, 2015 01:59 IST2015-07-13T01:59:36+5:302015-07-13T01:59:36+5:30

पातूर तालुक्यातील घटना.

A youth from Gelaga has poison | आलेगाव येथील युवकाने घेतले विष

आलेगाव येथील युवकाने घेतले विष

अकोला - पातूर तालुक्यातील आलेगाव येथील रहिवासी २८ वर्षीय युवकाने विष प्राशन केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी सवरेपचार रुग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे. आलेगाव येथील रहिवासी प्रदीप तोताराम नवलकार (२८) या युवकाने रविवारी सकाळी विष प्राशन केले. त्याला तातडीने सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. प्रदीप नवलकार याला आई व एक लहान भाऊ असल्याची माहिती आहे.

Web Title: A youth from Gelaga has poison