तरूणांनी गोमातेला दिले जीवदान
By Admin | Updated: April 17, 2015 01:50 IST2015-04-17T01:50:01+5:302015-04-17T01:50:01+5:30
कोरड्या विहिरीत पडलेल्या गायीला युवकांनी काढले सुचरूप बाहेर.

तरूणांनी गोमातेला दिले जीवदान
अकोला : शहरातील डाबकी रोडवर असलेल्या ४५ फूट खोल कोरड्या विहिरीत गुरुवारी सकाळी १0.३0 ते ११ वाज ताच्या दरम्यान पडलेल्या गायीला ज्ञानेश्वरनगरातील युवकांनी सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. कोरड्या विहिरीत गाय पडल्याने परिसरात खळबळ उडाली. गायीला बघण्याकरिता विहिरीजवळ गर्दी झाली होतीा. ही घटना पाहून ज्ञानेश्वरनगरातील नवनाथ कारंडे व बबलू सावंत यांनी गायीला दोरीच्या साहाय्याने बांधून अन्य युवकांच्या मदतीने बाहेर काढले. यावेळी या परिसरातील नीलेश निनोरे, बबलू सावंत, नवनाथ कारंडे, सचिन निनोरे, शेखर जांभे, सोनू वडालकर, रोहि तकुमार अभंग, मनोज राजपूत, गजानन या युवकांनी सहकार्य केले.