मुर्तीजापूर येथील युवकाचा कमळगंगा नदीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 20:13 IST2021-08-22T20:11:48+5:302021-08-22T20:13:05+5:30
Youth drowns in Kamalganga river : शेख नसीर हा रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकी वाहन धुन्यासाठी सोनाळा पळसोळा दरम्यान असलेल्या कमळगंगा नदीवर गेला.

मुर्तीजापूर येथील युवकाचा कमळगंगा नदीत बुडून मृत्यू
मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सोनाळा पळसोळा दरम्यान कमळगंगा नदीवरील पुलाखाली असलेल्या खोल पाण्यात बुडूनयुवकाचा मृत्यू झाल्याची घटना २२ अॉगष्ट रोजी २:३० वाजताच्या दरम्यान घडली. शेख नसीर अब्दुल मुस्ताक (३०रा. जुनीवस्ती घरकुल, मूर्तिजापूर) असे मृतक युवकाचे नाव आहे.
शेख नसीर हा रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकी वाहन धुन्यासाठी सोनाळा पळसोळा दरम्यान असलेल्या कमळगंगा नदीवर गेला. दुचाकी धुवून झाल्यावर त्याने वाघ यांच्या शेताजव जवळच्या पुलाखाली असलेल्या खोल पाण्यात उडी घेतली. पुलाला असलेल्या सळयांमध्ये मध्ये अडकल्याने तो बाहेर आलाच नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या सोबत असलेल्या दोन मुलांनी घटनेची माहिती त्याचे वडील अब्दुल मुस्ताक अब्दुल रज्जाक यांना दिली. वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटने संदर्भात अधिक तपास हेड कॉन्स्टेबल विजय मानकर करीत आहे.