युवकाचा मृत्यू; महिला ताब्यात

By Admin | Updated: June 6, 2017 00:55 IST2017-06-06T00:55:48+5:302017-06-06T00:55:48+5:30

अकोला: अकोट फैलमधील रहिवासी कुणाल दीपक सांगळे यास एका महिलेने काही दिवसांपूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर शनिवारी रात्री युवकास विष पाजले.

Youth death; Female possession | युवकाचा मृत्यू; महिला ताब्यात

युवकाचा मृत्यू; महिला ताब्यात

अकोला: अकोट फैलमधील रहिवासी कुणाल दीपक सांगळे यास एका महिलेने काही दिवसांपूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर शनिवारी रात्री युवकास विष पाजले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास सर्वोपचार रुग्णालयात शनिवारी उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादीनंतर पोलिसांनी सदर महिलेस ताब्यात घेतले आहे. याच महिलेने युवकाचा खून केला की नाही, यासंदर्भात पोलिसांकडून माहिती घेण्यात येत आहे. सदर महिलेच्या बोलण्यावर पोलिसांचा विश्वास बसत नसल्याने यामध्ये गौडबंगाल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Youth death; Female possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.