शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात युवक काँग्रेसने केले ‘निषेधासन’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 16:04 IST

अकोला : सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या विविध घोषणांची पुर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पुर्ण झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा व शहर युवक कॉँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी गांधी जवाहर बाग येथे निषेधासन आंदोलन करण्यात आले.

अकोला : सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या विविध घोषणांची पुर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पुर्ण झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा व शहर युवक कॉँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी गांधी जवाहर बाग येथे निषेधासन आंदोलन करण्यात आले. यु.काँ. जिल्हा (ग्रामीण)अध्यक्ष अ‍ॅड. महेश गणगणे व शहर अध्यक्ष अंशूमन देशमुख यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढणारी वेगवेगळ्या प्रकारची बारा आसने केली.राज्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना सरकारच्या कारकिदीर्ला बुधवारी चार वर्षे पुर्ण झाली असून, या सरकारने सत्तेवर येण्यापुर्वी केलेल्या घोेषणा व आश्वसनांची पुर्तता केली नसल्याने या सरकारच्या निषेधार्थ आंदोलनाची घोषणा युवक कॉंग्रेसने केली होती. केंद्र व राज्य सरकारला योगाची भाषा अधिक कळ ते त्यामुळे योगाच्या माध्यमातूनच निषेधासन करून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सकाळी नऊ वाजता गांधी-जवाहर बाग येथे जमलेल्या कॉँग्रेसजनांची अगोदर राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून मैदानात आसने करण्यास सुरूवात केली. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून शेतकºयांच्या हितासाठी सरकारला सुुबूद्धी मागणारी प्रार्थना करण्यात आली. या आंदोलनात पराग कांबळे, आकाश सिरसाट, संजय देशमुख, अब्दुल सलाम, अभिलाश तायडे, अक्षय गणोरकर, सैय्यद अजरोद्दीन, अब्दुल कलीम, सागर तेलगोटे, कपिल रावदेव, अनंतराव बगाडे, डॉ. भागवत, राजकुमार सिरसाट, पुष्पा देशमुख, डॉ. वर्षा बडगुजर, आशा कोपेकर, राहुल कुºहे, पुरुषोत्तम चतारे आदी सहभागी झाले. 

अशी केली निषेधासनेमराठा, धनगर आरक्षण, शेतक-यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर अभ्यासासन; फसवी कर्जमाफी, शिवराय, डॉ. आंबेडकर स्मारकाच्या विषयी घोषणासन किंवा गाजरासन; मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराची चौकशी न करता त्यांना क्लिनचिट दिल्याने क्लिनचिटासन; शेतक-यांविषयी अपशब्द काढणा-या मंत्र्यांच्या विरोधात वाचाळासन; महामार्ग कमी न केल्याच्या निषेधार्थ महागाईसन; रोजगार निर्मिती न केल्याच्या प्रश्नावर बेरोजगारासन; अंधभक्तांसाठी भक्तासन; सोशल माध्यमातील पेड ट्रोलच्या विरोधात ट्रोलासन; खोटे आश्वासन दिल्याने फसवणीसासन; प्रत्येक पश्नावर दिल्या जाणा-या धमकीच्या निषेधार्थ धमकीआसन; दुष्काळ प्रश्नी सदृष्य शब्द वापरल्याने अंशत: सन; राफेल प्रकरणात अंबानीला मदत केल्याने राफेलासन यावेळी करण्यात आले.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसagitationआंदोलन