व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत युवकाची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST2021-08-27T04:23:29+5:302021-08-27T04:23:29+5:30

गोळेगाव शिवारात मळसूर खिंडीत सावरगाव येथील ३० वर्षीय युवक पुरुषोत्तम गणेश करवते याने गुरुवारी दुपारी एका झाडाला ...

Youth commits suicide by posting status on WhatsApp! | व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत युवकाची आत्महत्या!

व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवत युवकाची आत्महत्या!

गोळेगाव शिवारात मळसूर खिंडीत सावरगाव येथील ३० वर्षीय युवक पुरुषोत्तम गणेश करवते याने गुरुवारी दुपारी एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुरुषोत्तम हा अविवाहित होता. मृत्यूपूर्वी त्याने तीन पानांची एक चिठ्ठी लिहिली असून, या चिठ्ठीमध्ये त्याने पोलिसांना उद्देशून माझ्या आत्महत्येस मीच जबाबदार असून, स्वखुशीने फाशी घेत असल्याचे सांगत त्याने, माझे कुटुंब खूप चांगले आहे. आई-बाई, बहीण, भाऊ चांगले असून, काका-काकू व शेजारीसुद्धा चांगले असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. आलेगाव-मळसूर रोडवर असलेल्या खिंडीत वन विभागाच्या जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे एका गुराख्याला दिसले. त्याने ही माहिती गावंडगाव येथील सरपंचांना दिली. सरपंचांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करून त्याचा मृतदेह अकोला येथे शवविच्छेदनासाठी पाठविला. पुरुषोत्तम हा नवेगाव येथील त्याच्या नातेवाइकाकडे आला होता. घरी परत जाताना त्याने आत्महत्या केल्याचे समजले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

फोटो:

सॉरी, माझी लाडकी ताई...

पुरुषोत्तम करवते याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत, माझी लहान बहीण खूप चांगली आहे. तिने माझ्यासाठी खूप काही केले, पण मी तिच्यासाठी काही करू शकत नाही. सॉरी माझी लाडकी ताई... असे म्हणत, त्याने, मी आता तुमच्या फॅमिलीमधून निघून जात आहे. पण माझ्या ताईला काही कमी पडू देऊ नका... अशी विनंती त्याने कुटुंबीयांना केली आहे.

Web Title: Youth commits suicide by posting status on WhatsApp!