युवकाची त्रासाला कंटाळून आत्महत्या, सात जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:23 IST2021-06-09T04:23:53+5:302021-06-09T04:23:53+5:30

विशाल मोतीराम मलिये (२८ रा. शिवाजी चौक तेल्हारा) याने ६ जून रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. तपास अधिकारी ...

Youth commits suicide due to harassment, crime against seven persons | युवकाची त्रासाला कंटाळून आत्महत्या, सात जणांविरुद्ध गुन्हा

युवकाची त्रासाला कंटाळून आत्महत्या, सात जणांविरुद्ध गुन्हा

विशाल मोतीराम मलिये (२८ रा. शिवाजी चौक तेल्हारा) याने ६ जून रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. तपास अधिकारी हेड कॉन्स्टेबल सुरेश काळे यांनी पंचनामा करून तपास केला असता, मृताच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. चिठ्ठीमध्ये भावना सुनील बाबरे, सुनील माणिक बाबरे रा. मंगरुळ, करुणा अशोक उदेवाल, अशोक पुंजाजी उदेवाल रा. अकोला, निकिता पंजाब कामे, पंकज रमेश कामे आणि मोतीराम लालचंद मलिये रा. तेल्हारा या सात जणांच्या त्रासाला कंटाळून गळफास लावत असल्याचे विशाल मलिये याने म्हटले आहे. पोलिसांनी त्याआधारे आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०६ (३४)नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Youth commits suicide due to harassment, crime against seven persons