लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST2021-02-05T06:19:57+5:302021-02-05T06:19:57+5:30

एका ३० वर्षीय महिलेने गावातील नीलेश तारिंगे (वय २७) याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ...

Youth commits suicide after being charged with sexual assault | लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने युवकाची आत्महत्या

लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने युवकाची आत्महत्या

एका ३० वर्षीय महिलेने गावातील नीलेश तारिंगे (वय २७) याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी गोरेगाव बुद्रुक येथील नीलेश तारिंगे या युवकाविरुद्ध २९ जानेवारी रोजी सायंकाळी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची माहिती युवकाला समजताच, तो व्यथित झाला. गावासह नातेवाइकांमध्ये बदनामी होईल. या भीतीने युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. प्रकरण चिघळण्याची भीती असल्याने, बाळापूर पोलिसांनी गावाकडे धाव घेतली आणि दोन्ही गटांतील लोकांची समजूत काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. गावातील तणावाची परिस्थिती पाहता, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. युवकाच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Youth commits suicide after being charged with sexual assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.