दारू पिण्यास पैसे न दिल्याने युवकांनी जाळले दुकान!

By Admin | Updated: March 26, 2016 02:27 IST2016-03-26T02:27:22+5:302016-03-26T02:27:22+5:30

लाखो रुपयांचा माल जळून खाक.

Youth burned shop without paying for liquor! | दारू पिण्यास पैसे न दिल्याने युवकांनी जाळले दुकान!

दारू पिण्यास पैसे न दिल्याने युवकांनी जाळले दुकान!

अकोला: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून तिघा युवकांनी चिडून गांधी रोडवरील दुकानाला आग लावली. ही घटना बुधवारी रात्री घडली. आगीमध्ये दुकानामधील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी तीन संशयित युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जुने शहरातील भारती प्लॉटमध्ये राहणारे शंकर बबनराव मेसरे(४0) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी होळी दहन असल्याने, रात्री दुकान बंद करून ते घरी गेले. दरम्यान, त्यांच्या घराजवळ राहणारे विशाल पाचपोर, राहुल मद्गल, सचिन भाकरे यांनी त्यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले; परंतु शंकर मेसरे यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या तिघा युवकांनी त्यांना धमकावले. बुधवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास शंकर मेसरे यांना फोन आला की, त्यांच्या दुकानाला आग लागली. ते तातडीने दुकानाजवळ पोहोचले. तोपर्यंत दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.

Web Title: Youth burned shop without paying for liquor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.